Filtrer par genre
माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!
मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!
हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!
कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल !
तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी!
Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more.
If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home.
So folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!
- 102 - 'मराठी खिडकीतून': शतक महोत्सवी एपिसोड :एक संवाद
गेल्या वर्षी तीन ऑगस्टला सुरू झालेल्या 'मराठी खिडकीतून' या पाॅडकास्टचा हा शंभरावा एपिसोड! त्यानिमित्ताने गेल्या वर्षभराचा आढावा घेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत:डॉक्टर राजीव आणि माणिक!
Thu, 01 Sep 2022 - 101 - मनमोकळ्या गप्पा.. दिलखुलास गप्पा..
'मराठी खिडकीतून' आपण स्वागत करत आहोत: बोलघेवड्या,'दोन बायका गप्पा ऐका' असं म्हणणाऱ्या,अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचं! त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना वेळ कसा गेला हे आम्हाला कळलंही नाही!त्या ऐकताना तुम्हालाही तसंच वाटेल!
Tue, 30 Aug 2022 - 100 - डोकावूया, व. पु. काळे यांच्या घरी
व. पु.काळे म्हणजे एक सिद्ध- हस्त लेखक! हरहुन्नरी कलावंत!चला तर, व. पुं. च्या दोन घरात डोकावू या! आधी दादरच्या, आणि नंतर वांद्र्याच्या साहित्य सहवास मधील घरात.
Thu, 25 Aug 2022 - 99 - न्यूटन आणि आईन्स्टाईन
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध तर लावलाच आणि 1686 साली गतीचे तीन नियम सुद्धा प्रस्थापित केले!गुरुत्वाकर्षणाला आणि गतीलाआईन्स्टाईननं एक वेगळंच परिमाण दिल! त्याविषयी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
Tue, 23 Aug 2022 - 98 - सुखी माणसाचा सदरा आणि एपीक्यूरस
प्रत्येक जणच सुख शोधत असतो, सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्युरस यांनी सांगितलेला सुखाचा मार्ग उलगडून दाखवत आहेत,डॉक्टर राजीव आणि माणिक.
Thu, 18 Aug 2022 - 97 - कवी म. म. देशपांडे यांची कविता: 'कळत नाही'
प्रसिद्धीपासून दूर राहिलेले कवी म. म.देशपांडे! त्यांच्या 'वनफूल'या पहिल्या कवितासंग्रहातली ही कविता, 'कळत नाही'. ही कविता म्हणजे कवीच्या व्याकुळ मनाचं स्वगत आहे! या कवितेचा रसास्वाद घेऊ या, डॉक्टर राजीव आणि माणिक यांच्या बरोबर:
Tue, 16 Aug 2022 - 96 - देऊ या ,आदिवासींना नवं भान
नागरी समाजापासून दूर आणि दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासीसमाजाविषयी, आणि या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांविषयी,डॉक्टर राजीव आणि माणिक तुमच्याशी संवाद साधत आहेत.
Thu, 11 Aug 2022 - 95 - देवरायांचं महत्व
वैदिक कालपासून देवराई ची संस्कृती चालत आली आहे! देवराई या संकल्पनेत श्रद्धा, आणि भीती सुद्धा दडलेली आहे! त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण,आणि संवर्धन कसं होतं,याविषयी तुमच्याशी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक.
Tue, 09 Aug 2022 - 94 - आपत्ती सुरक्षा आणि पेल्ट्झ परिणाम
कोणत्याही आपत्तीने माणूस हवालदिल होतो, पण त्याला थोडेफार सुरक्षा- कवच मिळाले की,तो निर्धास्त होतो! या पेल्ट्झ परिणामाबद्दल बोलत आहेत: डॉक्टर राजीव आणि माणिक.
Thu, 04 Aug 2022 - 93 - करड्या रसायन शास्त्राकडून, हिरव्या रसायन शास्त्राकडे
'हरित' रसायन शास्त्राचा पुरस्कर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायन- शास्त्रज्ञ-रॉबर्ट ग्रब्ज- यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल, आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक.
Tue, 02 Aug 2022 - 92 - पुस्तकाची शताब्दी
लुडविग् विटगेनस्टाईन यांनी 1921साली तत्त्वज्ञानावर लिहिलेल्या पुस्तकामुळे तत्वज्ञान शाखा कायमस्वरूपी बदलली! या पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल आपल्याशी बोलत आहेत :डॉक्टर राजीव आणि माणिक
Thu, 28 Jul 2022 - 91 - बेगम अख्तर संगीतातील गझलांकार
गझल सम्राज्ञी बेगम अख्तर म्हणजे खरोखरीच संगीताचा अनोखा अलंकार होता! त्यांच्या गायनाबद्दल आणि जीवनाबद्दल, आपल्याशी हळुवार हितगुज करत आहेत, डॉक्टर राजीव आणि माणिक
Tue, 26 Jul 2022 - 90 - द. मा. मिरासदार: उत्साहाचा झरा
द. मा. मिरासदार नामवंत विनोदी कथाकार होतेच, त्याचबरोबर आनंदी जीवनाचं उत्साही तत्त्वज्ञान हसत खेळत शिकवणारे सिद्धहस्त शिक्षक प्राध्यापक ही होते! मनोरंजनातून कलात्मक उंची गाठणाऱ्या द.मां. बद्दल बोलत आहेत,डॉक्टर राजीव आणि माणिक
Thu, 21 Jul 2022 - 89 - जीवनात गुरुचे महत्त्व
प्रत्येकाच्या जीवनात गुरूचं महत्त्व असतंच!या गुरूंविषयी, वेगवेगळ्या जीवन क्षेत्रातल्या त्यांच्या स्थानांबद्दल, आणि स्वतःच्या जीवनातल्या शिक्षकांच्या विषयी, डॉक्टर राजीव आणि माणिक तुमच्याशीगुप्तगू करत आहेत:
Tue, 19 Jul 2022 - 88 - विश्व निर्मिती आणि स्टीव्हन वाईनबर्ग
विश्वाची निर्हेतुकता सांगणाऱ्या आणि भौतिकशास्त्राला नवी दिशा देणाऱ्या स्टीव्हन वाईनबर्ग यांच्या विषयी आपल्याशी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
Thu, 14 Jul 2022 - 87 - पु.शि. रेगे आणि त्यांची कविता:अन् पहाट होता
पु.शि.रेगे हे कवी म्हणून आणि लेखक म्हणून मराठी साहित्याचं दालन समृद्ध करून गेले! ते मितभाषी आणि मिताक्षरी होते! शब्दातून ते बोलतच, पण शब्दापलीकडचेही बोलत! त्यांची ही सलगीच्या सुरात सांगितलेली आणि खट्याळ वातावरणातली कान-गोष्ट :अन् पहाट होता...
Tue, 12 Jul 2022 - 86 - टेम्स नदीच्या काठाकाठाने
लंडनमधल्या प्रसिद्ध टेम्स नदीच्या काठाकाठाने हिंडताना, या नदी विषयी,आणि ती स्वच्छ ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल, खूप आत्मीयतेनं आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
Thu, 07 Jul 2022 - 85 - शब्दांची पुनरुक्ती आणि झिप्फचासिद्धांत
बोलण्यात लिहिण्यात काही शब्दांची पुनरुक्ती होते!या विषयी झिप्फ या शास्त्रज्ञाने 1935 साली मांडलेला सिद्धांत,आज केवळ भाषेलाच नाही तर इतरही कितीतरी गोष्टींना लागू होतो! त्या विषयी आपल्याशी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
Tue, 05 Jul 2022 - 84 - निर्णय कसा घ्यावा?
पटकन शोधलेलं उत्तर, घेतलेला निर्णय योग्य, का सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य? याचं उत्तर आपल्याबरोबर शोधत आहेत, डॉक्टर राजीव आणि माणिक:
Thu, 30 Jun 2022 - 83 - संध्याकाळ, सांज-समय
संध्याकाळी कवींच्या मनात कवितेच्या ओळी उस्फुर्त पणे येतात!कितीतरी मराठी, हिंदी कविता आणि गाणी या संध्याकाळच्या वेळेवर आहेत!याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत,डॉक्टर राजीव आणि माणिक
Tue, 28 Jun 2022 - 82 - मराठी लोकनाट्य आणि त्यातील लावणी
When it comes to Marathi folklore, Lavani is one of the prominent art forms of the rural lifestyle. In this episode of Marathi Khidkitun listen to our hosts Dr. Rajiv and Manik Deshmukh speak about it and its journey all the way to cinema screens.
Thu, 23 Jun 2022 - 81 - वाचता-वाचता
सावंतवाडी पासून पुण्यापर्यंत आणि मेघालया पासून ते कच्छ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी चाललेल्या घटनांबद्दल वाचता-वाचता मिळालेली माहिती तुम्हाला सांगताहेत डॉक्टर राजीव आणि माणिक.
Tue, 21 Jun 2022 - 80 - कवी ग्रेस आणि त्यांचं घर
कवी ग्रेस यांची कविता, म्हणजे काहीशी अगम्य,पण मनाला भुरळ घालणारी !... ...आणि अशी दुर्बोधता प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या कवी ग्रेस यांच्या घरी घेऊन जात आहेत,डॉक्टर राजीव आणि माणिक
Thu, 16 Jun 2022 - 79 - मराठी प्रकाशकांच्या तीन सहोदर जोड्या
आपल्या मराठी भाषेतील नियतकालिके आणि पुस्तके संपादन करणाऱ्या आणि प्रकाशित करणाऱ्या तीन बंधूद्वयां बद्दल आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक
Tue, 14 Jun 2022 - 78 - संग्राहक आणि संग्रहालये भाग २
पॅरिस मधलं लुव्र, लंडन मधलं टॉवर ऑफ लंडन, हैदराबादचे सालारजंग म्युझियम आणि पुण्यातलं राजा दिनकर केळकर म्युझियम याचीच साक्ष आहेत! चला तर बघूयात ही वेगवेगळीसंग्रहालयं: ह्या मराठी खिडकीतूनच्या एपिसोड मधून.
Thu, 09 Jun 2022 - 77 - संग्राहक आणि संग्रहालये भाग १
विविध वस्तू जमवण्याचा, त्यांचा संग्रह करण्याचा, माणसाचा स्वभाव असतो! या वृत्तीतूनच जगभरामध्ये वेगवेगळी संग्रहालयं निर्माण झाली!
Tue, 07 Jun 2022 - 76 - चला जाऊ या, गो नी दांडेकर यांच्या घरी
डॉक्टर राजीव आणि माणिक आपल्याला घेऊन जात आहेत , गो नी दांडेकर यांच्या तळेगाव मधल्या घरात!किती वेगळं आणि अगत्यशील हे घर आहे,ते आपण बघूया:
Thu, 02 Jun 2022 - 75 - गो नी दांडेकर एक मनस्वी लेखक
गो नी दांडेकर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि लेखनाबद्दल जितकं लिहावं तितकं थोडंच आहे,असं त्यांचं बहुरंगी बहुढंगी जीवन आहे! त्याची एक झलक बघू या डॉक्टर राजीव आणि माणिक बरोबर:
Tue, 31 May 2022 - 74 - मानवाच्या जीवनात, झोपेचे महत्त्व
माणसाला झोपेची अत्यंत आवश्यकता असते! नीट झोप झाली नाही तर माणसाचा स्वभाव चिडचिडा होतो, त्याच्या हातून चुका होऊ शकतात, आणि त्याला निरनिराळे आजारही होऊ शकतात! झोपेचे महत्त्व सांगताहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
Thu, 26 May 2022 - 73 - सृष्टी मधले आंतर ध्यान!
आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये कितीतरी प्राणी, पक्षी, नांदत असतात! ते कळपाने राहतात, थव्याने उडतात, ,पण कधीही त्यांचा एकमेकांना धक्का लागत नाही! सृष्टी मधल्या या अंतराच्या भानाचं ज्ञान त्यांना कुठून येतं, हे जाणून घेऊया :डॉक्टर राजीव आणि माणिक बरोबर:
Tue, 24 May 2022 - 72 - काया कल्प गावांचा
एका व्यक्तीने पुढाकार घेऊन चालू केलेल्या संस्थेमुळे, एखाद्या स्फुल्लिंगा प्रमाणे सगळ्या गावाचा कायापालट होऊ शकतो! अशा काही स्फूर्तीदायक कामांचा आढावा घेऊया, डॉक्टर राजीव आणि माणिक बरोबर:
Thu, 19 May 2022 - 71 - 'चंद्रमुखी' अमृता खानविलकर सोबत एक खास मुलाखत
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आपल्या अभिनयानं गाजवणाऱ्या अमृता खानविलकरशी मनमोकळ्या गप्पा मारत आहेत, डॉक्टर राजीव आणि माणिक:
Tue, 17 May 2022 - 70 - माधव ज्युलियन यांची कविता: माळवारा
'मराठी असे आमुची मायबोली' किंवा 'प्रेमस्वरूप आई' अशा कविता लिहिणारे माधव ज्युलियन, नेहमीच प्रेम आणि शांतीचा संदेश त्यांच्या काव्यातून देणारे आणि मराठीचा अभिमान मिरवणारे माधव जुलियन! त्यांची ही एक आगळीवेगळी कविता आपण समजून घेऊ या: माळवारा.
Thu, 12 May 2022 - 69 - रविकिरण मंडळ आणि माधव ज्युलियन
मराठी काव्याच्या प्रवासामध्ये रविकिरण मंडळाचे स्थान फार महत्त्वाचे आहे! मराठी कवितेत आधुनिकतेचा पाया त्यांनी घातला ! रविकिरण मंडळाचे अध्वर्यू होते माधव ज्युलियन, म्हणजेच माधवराव पटवर्धन!त्याविषयी माहिती करून घेऊया:
Tue, 10 May 2022 - 68 - आचार्य अत्रे आणि झेंडूची फुले
आचार्य अत्रे यांच्या विडंबन कवितांचा संग्रह म्हणजे 'झेंडूची फुले' हे पुस्तक! 1925 च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकातली झेंडूची फुले अजूनही ताजी तवानी वाटतात! चला तर, जाणून घेऊया, या टवटवीत झेंडूच्या फुलांचे रहस्य, डॉक्टर राजीव आणि माणिक कडून:
Thu, 05 May 2022 - 67 - देव नागरी लिपी आणि तिचे सौंदर्य
आज अक्षय तृतीया आहे, साडेतीन मुहूर्त मधला अर्धा मुहूर्त !सोन्याच्या खरेदीसाठी खूप चांगला !आजच्या या सुमुहूर्तावर आपण आपल्या मराठी भाषेच्या देवनागरी लिपी बद्दल, त्यातल्या सुवर्णाक्षरांची माहिती करून घेऊ:
Tue, 03 May 2022 - 66 - कालनिर्णय दिनदर्शिकेची सुवर्ण जयंती: भाग २
जयंत साळगावकरांनी कालनिर्णय दिनदर्शिका चालू केल्याला 50 वर्ष होत आहेत !त्यानिमित्त त्यांचे चिरंजीव आणि संचालक श्री जयराज साळगावकर यांच्याशी मनमोकळी बातचीत: भाग २
Thu, 28 Apr 2022 - 65 - कालनिर्णय दिनदर्शिकेची सुवर्ण जयंती: भाग १
जयंत साळगावकरांनी कालनिर्णय दिनदर्शिका चालू केल्याला 50 वर्ष होत आहेत !त्यानिमित्त त्यांचे चिरंजीव आणि संचालक श्री जयराज साळगावकर यांच्याशी मनमोकळी बातचीत: भाग 1.
Tue, 26 Apr 2022 - 64 - घर एका विचार वंत संशोधकाचं
पुस्तकांबद्दल आणि माणसांबद्दल खूप आपुलकीने वागणारं आणि एकमेकांना धरून राहणारं घर !चला ,या घराला भेट देऊया:
Thu, 21 Apr 2022 - 63 - लोकसाहित्याचे अभ्यासक: रा. चिं. ढेरे : एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व
डॉक्टर रा चिं ढेरे यांचं लोकसाहित्यावरचे संशोधन हा एक अमूल्य ठेवा आहे! आणि तो नुसता जपण्याचाच नव्हे तर पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे: डॉ. रा चिं ढेरे संस्कृती संशोधन केंद्र :त्याविषयी जाणून घेऊ या.
Tue, 19 Apr 2022 - 61 - लक्ष कालावधी
खरंच का माणसाचा लक्ष कालावधी म्हणजे attention span कमी झाला आहे का?आणि तसं असेल तर त्याच्यावर उपाय काय? आपल्याशी त्या विषयी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक
Thu, 14 Apr 2022 - 60 - अवतीभवती
आपण आपल्या अवती-भवती पाहिलं, तर कितीतरी माणसं कुठलाही गाजावाजा न करता समाजासाठी झटत असतात, मन लावून काम करत असतात! चला तर त्यांची गाठ घेऊ या!
Tue, 12 Apr 2022 - 59 - भटकंती दापोलीची
दापोलीला 'रत्नांची खाण' असं म्हटलं जातं! आपल्याला माहीत असलेली कितीतरी थोर मंडळी दापोलीच्या परिसरातली आहेत!दापोलीच्या भटकंतीत आपण या सगळ्या मंडळींना भेटूयात का?
Thu, 07 Apr 2022 - 58 - इंडोलॉजीस्ट सानिया मानेशी बातचीत
मंडळी, आज आपल्याकडे इंडोलॉजीस्ट सानिया माने आल्या आहेत. त्या कम्युनिकेशन स्किल मध्ये सर्टिफाइड ट्रेनर आहेत!पधिल हेरिटेज टुरिझम च्या संस्थापिका आणि संचालिका आहेत! 'अखंड भारत'या त्यांच्या नवीन संकल्पनेविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारूया:
Tue, 05 Apr 2022 - 57 - २६ मीना बाग: कवी अनिल यांचं घर!
दिल्लीतल्या मीना बागेत जाऊया, कवी अनिल यांच्या घरी !आपल्याला हे घर दाखवत आहेत मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष,डॉक्टर राजीव आणि माणिक यांच्या बरोबर....
Thu, 31 Mar 2022 - 56 - केळीचे सुकले बाग असुनिया पाणी
कवी अनिल यांची ही गाजलेली भावकविता! तिचा अन्वयार्थ लावून ती आपण समजुन घेऊ या डॉक्टर राजीव आणि माणिक यांच्या बरोबर!
Tue, 29 Mar 2022 - 55 - विज्ञान साहित्य
मराठी मध्ये विज्ञानावर आधारित कथा कमी आहेत. विज्ञान साहित्याचा प्रसार होणं आवश्यक आहे, असं मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री जयंत नारळीकरांनी आवर्जून सांगितलं आहे! त्याबद्दल आपल्याशी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक
Thu, 24 Mar 2022 - 54 - अतींद्रिय शक्ती आणि क्षमता
कुत्रा हत्ती अशांसारख्या प्राण्यांमध्ये काही अतिंद्रिय क्षमता असतात! तशाच क्षमता काही स्वमग्न व्यक्तींमध्ये आढळून येतात! चला तर, या अतिंद्रिय क्षमतांच्या प्रदेशात फेरफटका मारू यात...
Tue, 22 Mar 2022 - 53 - उपेक्षित लोककला
अभिजात कलेचा वारसा लोककलातून जपला जातो, म्हणून, भजन, भारुड, गोंधळ, या लोककला फार महत्त्वाच्या आहेत! काही लोक कला मात्र उपेक्षित राहिलेल्या आहेत. त्यातल्या दोन लोककला म्हणजे वही गायन आणि आराध्यांचा मेळा! त्यांचा कानोसा घेऊ यात डॉक्टर राजीव आणि माणिक बरोबर
Thu, 17 Mar 2022 - 52 - एक अप्रकाशित रत्न
डॉक्टर राजीव आणि माणिक आपल्याशी बोलत आहेत एका वैज्ञानिक संशोधका बद्दल!डॉक्टर बिभा चौधरी या पदार्थविज्ञान म्हणजे भौतिकशास्त्राच्या संशोधक होत्या!त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही!चला तर ऐकूयात डॉक्टर बिभा चौधरींबद्दल.
Tue, 15 Mar 2022 - 51 - स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रीय युवा दिन
12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस!त्यानिमित्ताने भारतभर साजऱ्या होणाऱ्या 'राष्ट्रीय युवा दिना'बद्दल बोलताहेत डॉक्टर राजीव आणि माणिक
Thu, 20 Jan 2022 - 50 - कीटकांच्या दुनियेत!
On today's episode of Marathi Khidkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh Talk about Insects and why they play an important part in the cycle of nature! Tune in to learn about it.
Tue, 18 Jan 2022 - 49 - नाट्य दिग्दर्शन: एक सर्जन कला
नाट्य दिग्दर्शक म्हणजे नट आणि नाटक यांना जोडणारा दुवा! नाट्य दिग्दर्शनाबद्दल आणि काही नाट्य दिग्दर्शकांबद्दल बोलत आहेत, डॉक्टर राजीव आणि माणिक
Thu, 13 Jan 2022 - 48 - पद्माताई गोळे आणि त्यांची कविता: चाफ्याच्या झाडा
On Marathi Kidkitun, Dr. Rajiv and Manik talk about the famous poem 'Chafyacha Zada' by poet Padmatai Gole and her life in time. Tune in to Marathi Kidkitun.
Tue, 11 Jan 2022 - 47 - हा खेळ सावल्यांचाThu, 06 Jan 2022
- 46 - स्नान आणि स्नानगृहे
On Marathi Khidkitun, Our hosts Dr. Rajiv and Manik take us on a tour of the different public baths around the world. Tune in to know more.
Tue, 04 Jan 2022 - 45 - हातावर तुरी
Dr. Rajiv and Manik tell us about the importance of Toor Dal and the 'Geographical index' (GI) that the Navapur Toor dal received, on this episode of Marathi Khidkitun.
Thu, 30 Dec 2021 - 44 - गवत, लॉन आणि आपण
Agriculture led to the flourishing of Human Civilization. Taking us through this journey are Dr. Rajiv & Manik Deshmukh on Marathi Khidkitun.
Tue, 28 Dec 2021 - 43 - ग दि माडगूळकर यांची 'पंचवटी'Thu, 23 Dec 2021
- 42 - विसरता विसरेना: ग.दि. माडगूळकरांची भावकविताTue, 21 Dec 2021
- 41 - भारतातील धवल क्रांतीThu, 16 Dec 2021
- 40 - बुद्धिमत्ता नैसर्गिक आणि कृत्रिमTue, 14 Dec 2021
- 39 - अशी ही बनवाबनवीThu, 09 Dec 2021
- 38 - मराठीतील दोन लेणी लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी
आचार्य अत्रे म्हणाले होते की लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे आणि 'बहिणाबाईंची गाणी'हा कविता संग्रह, ही मराठी साहित्यातील दोन मौल्यवान लेणी आहेत!
Tue, 07 Dec 2021 - 37 - थापा,गप्पा आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स!
थापा मारण्याच्या कलेबद्दल गप्पा मारता मारता डॉक्टर राजीव आणि मणिक आपल्याशी बोलत आहेत अफवांबद्दल आणि समाज माध्यमातील अफवांची उकल,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरुन करण्याविषयी़.
Thu, 02 Dec 2021 - 36 - दिव्यांगाची झुंजार जिद्द!
On this episode, Dr. Rajiv and Manik talk about how everyone sympathizes with the differently-abled but what they need is to be treated equally!.
Tue, 30 Nov 2021 - 35 - मंगेश पाडगावकर: घर कविराजांचे
Hello Folks! Let's go to Sion today, at Sai Prasad- the home of the great poet Mangesh Padgaonkar from where he penned down his phenomenal poems. Join us, Rajiv & Manik Deshmukh, only on Marathi Khidkitun!
Thu, 25 Nov 2021 - 34 - मंगेश पाडगावकर: एक कॅलिडोस्कोप
On this episode of Marathi Khidkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh track the poetic flow and poetic journey with Mangesh Padgaonkar, the evergreen kaleidoscope of poetry!
Tue, 23 Nov 2021 - 33 - बालोद्यान ते बालचित्रवाणी: प्रीती(जया)पोतदार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा भाग २
प्रीती पोतदार म्हणजे पूर्वाश्रमीच्या जयश्री कर्णिक.त्यांनी दृक-श्राव्य माध्यमाला दिलेल्या योगदानाविषयी माहिती करून घेऊ, त्यांनी डॉक्टर राजीव आणि माणिक यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पां मधून:
Thu, 18 Nov 2021 - 32 - बालोद्यान ते बालचित्रवाणी: प्रीती(जया)पोतदार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा भाग १
प्रीती पोतदार म्हणजे पूर्वाश्रमीच्या जयश्री कर्णिक.त्यांनी दृक-श्राव्य माध्यमाला दिलेल्या योगदानाविषयी माहिती करून घेऊ, त्यांनी डॉक्टर राजीव आणि माणिक यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पां मधून:
Tue, 16 Nov 2021 - 31 - चला प्रवासाला जाऊ
On this episode of Marathi Khidkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh are taking us on a journey to Aurangabad, Ellora, Ajanta.
Thu, 11 Nov 2021 - 30 - पत्रास कारण की
काही पत्रे पोस्टाने पाठवलेली:जी पोस्टमन पोचवतो!काही पत्रे पोस्टाने न पाठवलेली: स्वतः दिलेली,तर काही वहीत,पुस्तकात, लपवून दिलेली! काही पत्रे कवितेची,तर काही गाण्यातली! पत्रांच्या दुनियेत घेऊन जात आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
Tue, 09 Nov 2021 - 29 - महाराष्ट्राची शान: किल्ले रायगड भाग दुसरा
Dr. Rajiv and Manik Deshmukh are talking to Shekhar Nanivadekar about the Pride of Maharashtra: Raigad Fort refreshing the memories of how we'd build forts in Diwali as children!
Thu, 04 Nov 2021 - 28 - महाराष्ट्राची शान: किल्ले रायगड भाग पहिला
This Diwali, we are making a trip to Raigad fort, the capital and Chatrapati Shivaji Maharaj's coronation place.
Tue, 02 Nov 2021 - 27 - लेखक आणि त्याची निष्ठा
On this episode of Marathi Khidkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh talk about an author's loyalty to writing
Thu, 28 Oct 2021 - 26 - सायकल आणि आपण
On this episode of Marathi Khidkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh talk about our close relationship with bicycles since childhood! Tune in as our hosts take us on a ride!
Tue, 26 Oct 2021 - 25 - विस्मरणा पासून ते सुडोकू पर्यंत
In this episode Dr. Rajiv and Manik Deshmukh discuss Mental Health and age, and whether forgetfulness grows with age, andhow solving crosswords and sudoku can help prevent it. Tune in for this and much more.
Thu, 21 Oct 2021 - 24 - अंगठाबहाद्दर
In this episode Dr. Rajiv and Manik Deshmukh talk about the human thumb and why it is a gift given by god! And thanks to its design
Tue, 19 Oct 2021 - 23 - चला जाऊया रत्नाकर मतकरींच्या घरी
On this episode of Marathi Khidkitun, Dr. Rajiv and Manik Deshmukh take us to Ratnakar Matkari's house with the idea of 'Atithi Devo Bhava'. For the children's theater folks, this house is a learning place!
Thu, 14 Oct 2021 - 22 - रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजलीTue, 12 Oct 2021
- 21 - बहुआयामी मीनलशी बातचीत (भाग दुसरा)
In this episode, Dr. Rajiv and Manik Deshmukh talk to Meenal Gokhale about her contribution to everything from acting in the Marathi theater to social work!
Thu, 07 Oct 2021 - 20 - बहुआयामी मीनलशी बातचीत
In this episode, Dr. Rajiv and Manik Deshmukh talk to Meenal Gokhale about her contribution to everything from acting in the Marathi theater to social work! Tune in, to know about it from them through Marathi Khidkitun.
Tue, 05 Oct 2021 - 19 - तो डावा हात
डावखुर्या लोकांना कमी न लेखता त्यांना समजून घेतलं पाहिजे,असं आपल्याला आवर्जून सांगत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक: मराठी खिडकीतून
Thu, 30 Sep 2021 - 18 - भाषांविषयी बोलू काही
डॉक्टर राजीव आणि माणिक भारतात बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषांबद्दल, भाषेच्या उत्पत्ती आणि उत्क्रांती बद्दल, आपल्याशी संवाद साधत आहेत!मराठीचा अभिमान बाळगताना इतर भाषांचाही आदर ठेवला पाहिजे!
Tue, 28 Sep 2021 - 17 - जाऊया साहित्य सहवास मध्ये, विंदा करंदीकर यांच्या घरी
Three ways to go to Vinda Karandikar's house! One goes through his short essay, the other goes through his poetry and the third goes up the stairs to the next door. Tune in to this episode as Dr Rajiv and Manik Deshmukh take you to Vinda's house.
Thu, 23 Sep 2021 - 16 - विंदा करंदीकर यांची सदाबहार कविता
In this episode Dr. Rajiv and Manik Deshmukh present the poem 'Gheta' by 'Vinda Karandikar', who was honored with the Jnanpith award.
Tue, 21 Sep 2021 - 15 - मातृभाषा आणि आपण
Marathi language, Marathi literature, are all related to Marathi culture! Tune in to this episode as Dr. Rajiv and Manik Deshmukh discuss the richness of the language.
Thu, 16 Sep 2021 - 14 - गोष्ट मिथकांची
There are descriptions of cobras in different myths - in different countries of India and East Asia, there are depictions of cobras in sculptures!
Tue, 14 Sep 2021 - 13 - नाटककार, नट आणि नाटक
Drama is the perfect combination of a wise playwright and a wise actor! Acting doesn't just happen through the throat, it doesn't happen through the voice, it happens through every part of the body!
Thu, 09 Sep 2021 - 12 - कामगिरी स्त्रियांचीTue, 07 Sep 2021
- 11 - इंदिरा संतांचे घर
'मराठी साहित्याचं लेणं'असं ज्यांच्या कवितेला म्हटलं जातं, त्या इंदिरा संतांच्या घराविषयी तुम्हाला नक्कीच कुतूहल असेल ना?
Thu, 02 Sep 2021 - 10 - कवयत्री इंदिरा संतांची 'कुब्जा'
स्वप्नरंजन कुब्जेच्या अंतरंगाचं: ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या 'कुब्जा' या कवितेचा रसास्वाद आपण ऐकू या 'मराठी खिडकीतून'
Tue, 31 Aug 2021 - 9 - दूरदर्शनचे दिवस, ज्योत्स्ना किर्पेकर यांच्या सोबत:पुढचा भाग
1972 मध्ये जेव्हा मुंबई दूरदर्शन सुरू झालं त्यावेळी दूरदर्शनवर दिसलेला पहिला चेहरा होता,वृत्तनिवेदिका ज्योत्स्ना किरपेकर यांचा!
Thu, 26 Aug 2021 - 8 - दूरदर्शनचे दिवस ज्योत्स्ना किर्पेकर यांच्या सोबत
When Mumbai Doordarshan started in 1972, the first face to appear on the screen, was that of news reporter, Jyotsna Kirpekar!
Tue, 24 Aug 2021 - 7 - एका लग्नाची दुसरी गोष्टThu, 19 Aug 2021
- 6 - एका लग्नाची पहिली गोष्टTue, 17 Aug 2021
- 5 - मैत्रीविषयी बोलू काहीThu, 12 Aug 2021
- 4 - आठवणीत रमतानाTue, 10 Aug 2021
- 3 - मनासारखं घर,घरासारखं मनThu, 05 Aug 2021
- 2 - मन फिरूनी पावसातTue, 03 Aug 2021
Podcasts similaires à Marathi Khidkitun
- الحل إيه؟ مع رباب المهدي - Elhal Eh? with Rabab El-Mahdi Alternative Policy Solutions - حلول للسياسات البديلة
- بعد أمس Atheer ~ أثير
- El Partidazo de COPE COPE
- Herrera en COPE COPE
- The Dan Bongino Show Cumulus Podcast Network | Dan Bongino
- Es la Mañana de Federico esRadio
- La Noche de Dieter esRadio
- Hondelatte Raconte - Christophe Hondelatte Europe 1
- La Grande interview Europe 1 - CNews Europe 1
- franceinfo: Les informés France Info
- ملفات بولـيسية Medi1 Podcast
- La rosa de los vientos OndaCero
- Más de uno OndaCero
- Archives d'Afrique RFI
- Les histoires incroyables de Pierre Bellemare RTL
- El Larguero SER Podcast
- Nadie Sabe Nada SER Podcast
- SER Historia SER Podcast
- Todo Concostrina SER Podcast
- The Tucker Carlson Show Tucker Carlson Network
- فنجان مع عبدالرحمن أبومالح ثمانية/ thmanyah
- العلم والإيمان - د. مصطفى محمود علم ينتفع به
- نقاش مونت كارلو الدولية مونت كارلو الدولية / MCD
- 辛坊治郎 ズーム そこまで言うか! ニッポン放送