Filtrer par genre
आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or queries mail us on podcast@d4mad.in
- 21 - गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach Zaad
दिवस इतके बदललेत की आता कुठल्या गोष्टीबद्दल आपल्यात भावनाच शिल्लक राहिल्या नाहीत, सणांचा आनंद नाही, युद्धाचं दुःख नाही, भरभराटीचं सुख नाही, कितीही मिळालं तरी तृप्ती नाही. आयुष्य यांत्रिक झाली आणि आपण आपल्या पुढच्या पिढीच्याही नकळत तेच हातात देणार आहोत. आपल्यातली आपुलकी ही जुन्या पातळासारखी दिवसेंदिवस विरळ होत चाललीये. विरळ याकरिता कारण अजूनही काही लोक आहेत ज्यांच्यातल्या भावना माणूस असो वा प्राणी, नाती असो वा निसर्ग प्रत्येकासाठी आजही ज्वलंत आहेत. म्हणून ही आपुलकी विरळ का होईना पण जिवंत तर आहे.
आजची ही स्टोरीही तीन पिढ्यांची आहे. एका पिढीत माणूसपण जिवंत आहे तर दुसरीत लोप पावलंय, आता हे पुढच्या पिढीला काय देणार हे जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला ही स्टोरी ऐकायला हवी. गोष्टीचं नाव आहे, गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड! ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने व कंपोज केलीये आकाश जाधव ने. विरळ होत चालेल्या भावनेवर आजही नितांत प्रेम करणाऱ्यांना समर्पित. गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड!
Credits -
Writer - Dipak Bhutekar
Story Editor & Social Media - Sharda Bhawar
SFX, Sound & Packaging - Akash Jadhav
Anchor Voice Artist - Prasad Deshmukh
Voice over artists -
Shaunak Mule, Purva Bhoyte, Harshada Mali, Atharva Tembhekar, Akash Jadhav, Prasad Deshmukh
अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
instagram - @sjm_podcast
Thu, 02 Jun 2022 - 08min - 20 - मूर्खांचा बाजार डॉट कॉम | Murkhancha Bazaar Dot Com
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण डोन्ट वरी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवी गोष्ट, एक नवा आनंद! Story Junction Marathi Podcast वर आजची स्टोरी खऱ्या आयुष्यावर आधारित आहे; आता तुम्ही म्हणाला कुणाच्या ? तर प्रत्येकाच्या! हि फेस प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एकदा नक्की येते आणि आयुष्य वाटेवर अनन्या ऐवजी पार वाट लावून जाते. तुम्ही जर जॉबलेस असाल तर हि स्टोरी तुमचीच आहे आणि जॉबलेस नसाल तरीहि तुमचीच आहे . Enjoy करा - मूर्खांचा बाजार डॉट कॉम
Credits -
Writer - Dipak Bhutekar
Story Editor & Social Media - Sharda Bhawar
SFX, Sound & Packaging - Akash Jadhav
Anchor Voice Artist - Prasad Deshmukh
Voice over artists -
Shaunak Mule, Purva Bhoyte, Harshada Mali, Atharva Tembhekar, Akash Jadhav, Prasad Deshmukh
अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
Wed, 23 Feb 2022 - 09min - 19 - Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर)
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण याचीच परतफेड म्हणून आम्ही घेऊन आलोय एक भन्नाट Podcast Series, 'The Last chapter'!! याशिवाय आजचा दिवस आपल्यासाठी फार विशेष आहे, कारण आज स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टला एक वर्ष पूर्ण झालंय आणि शून्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात आज विविध देशांमधून आपल्यासोबत ३०,००० हून अधिक लोक जोडले गेलेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या Series चे सगळे Episodes upload केलेत; तर तुमच्या Entertainment मध्ये कुठेही खंड पडणार नाही याची आम्ही खात्री देतो. Enjoy करा - 'The Last Chapter' चा पहिला भाग, ज्याचं नाव आहे, 'पुढे काय?' Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
Mon, 31 May 2021 - 11min - 18 - Ep. 2. Godavari (The Last Chapter) | गोदावरी (द लास्ट चॅप्टर)
सचिन डोक्यात राग घेऊन घराबाहेर पडला खरा पण पुढे काय? ते म्हणतात ना, तळ्यातल्या बेडकाला समुद्रातील अडचणींची कल्पना नसते; त्याप्रमाणेच सचिनलाही बाहेरच्या जगाची मुळीच कल्पना नाही. इथे जेवढे चांगले लोक आहेत त्याहून कैकपट विक्षिप्त, क्रूर आणि निर्दयी माणसांची गर्दी आहे, तिला तोंड दिलं तर जिंकला, नाहीतर संपला. मुळात सचिन आता जाणार तरी कुठे? कुठे राहणार? प्रश्न खूप आहेत, म्हणून आता वेळ न घालवता ऐका 'The Last chapter' चा दुसरा भाग, गोदावरी! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
Mon, 31 May 2021 - 10min - 17 - Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर)
स्वप्नांना ध्येय बनवून त्यांच्यामागे धावणं उत्तमच, पण तडकाफडकी निर्णय घेऊन आपण काही अनभिज्ञ अडचणींना निमंत्रण देत असतो. सचिननेही तेच तर केलं, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता इथे आला. या नव्या शहराने शहराने त्याला गोंजारलं, थोपटलं, राहायला एक कोपरा आणि जीवाला क्षणिक विसावा दिला. पण रस्त्यातल्या मोजक्या काट्यांना सचिन फार लवकर कंटाळला. कदाचित त्याला आपल्या निर्णयावरच पश्चाताप झाला, पण गोष्ट इथे संपत नाही तर सुरु होते! कशी ते जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा तिसरा भाग, पुनर्जन्म! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
Mon, 31 May 2021 - 09min - 16 - Ep. 4. Bookmark (The Last Chapter) | बुकमार्क (द लास्ट चॅप्टर)
मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंत की सचिनला राघवने कशाप्रकारे वाचवलं आणि फायनली सचिनला राहण्यासाठी घरही मिळालं. आयुष्याच्या वळणावर बऱ्याचदा अशा अडचणी समोर उभ्या राहतात तेव्हा वाटतं की बस, आता स्वतःला संपवावं. तेव्हा जरा थांबायला हवं आणि एकदा, फक्त एकदा विचारपूर्वक असा विचार करायला हवा की, खरंच संपलं सगळं? यहां हर चीज का सोल्युशन हैं मेरे भाई, इथे कधीच पर्याय संपत नाहीत. असो, सचिनच्या आयुष्यात आता ही काय नवीन भानगड येऊन ठेपलीये हे जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा चौथा भाग बुकमार्क! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
Mon, 31 May 2021 - 14min - 15 - Ep. 5. Anapekshit (The Last Chapter) | अनपेक्षित (द लास्ट चॅप्टर)
गोष्ट जसजशी पुढे जातीये गुंता आणखीनच वाढत जातोय. राघव असा का वागतोय? सायली बिचारी गोड मुलगी आता कुठे जाणार? आणि सचिन यावर काही करणार की नाही?? मैत्रीत चढ-उतार तर येतातच पण इथे त्यामागचं नक्की कारण काय? तेच कळायला मार्ग नाही. असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असले तरी त्यांची उत्तरं काही जास्त लांब नाही, सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल, त्यासाठीच ऐका 'The Last Chapter'चा पाचवा भाग, अनपेक्षित! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
Mon, 31 May 2021 - 17min - 14 - Ep. 6. Purnviram (The Last Chapter) | पूर्णविराम (द लास्ट चॅप्टर)
मित्रांनो, आता आपण या सिरीजच्या शेवटच्या भागात आहोत. जर तुम्ही द लास्ट चॅप्टरचे यापूर्वीचे 5 एपिसोड्स ऐकले नसतील तर आधी ते ऐका जेणेकरून तुम्हाला हा भाग कळेलही आणि या सिरीजची पूर्ण मजा घेता येईल. जर तुम्ही या आधीचे एपिसोड्स ऐकले असतील तर मागच्या भागात काय झालं हे तुम्हाला ठाऊक असेलच. तर आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची घाई झालीये ना? सो उगाच वेळ न घालवता ऐका 'The Last Chapter'चा शेवटचा एपिसोड पूर्णविराम.. Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in
Mon, 31 May 2021 - 14min - 13 - Ep. 08. Saangata (Lockdown chya Goshti) | सांगता (लॉकडाऊनच्या गोष्टी)
प्रेम... कुणी माणसांवर करावं, कुणी प्राण्यांवर तर कुणी आपल्या कामांवर! प्रेम कुणावरही असो, अनुभव मात्र खूप देतं; कधी हळवा आनंद देतं तर कधी बोचणारे दुःख, कधी आयुष्याच्या सागरात हेलकावे खात-खात लांबवर घेऊन जातं तर कधी क्षणार्धात बुडवून सगळं संपवून टाकतं. तरीही प्रेम म्हणजे काळ, वेळ, परिस्तिथी, वय या सगळ्यांच्या मर्यादा न जुमानता हवंहवंसं वाटणारं एक सुख; जमीनजुमला, पैसाअडका या सगळ्यापेक्षा मोठं आणि मौल्यवान! आपल्या कामांवर असंच अथांग प्रेम करणाऱ्या एका बापाची ही गोष्ट... 'सांगता'!
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख ने व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
आपल्या याStory Junctionवर 'लॉकडाऊनच्या गोष्टी' या मालिकेला तुम्ही खूप प्रेम दिलंत, हा या मालिकेचा शेवटचा भाग... पण काळजी करू नका कारण आपल्या याJunctionवर लवकरच नवनवीन आणि भन्नाट गोष्टींची आणखी एक ट्रेन येतीये !
काही दिवसांआधीच सुरु झालेला हा प्रवास थोडा अवघड पण खूप सुंदर होता. अगदी काही महिन्यांतच आपला परिवार १० हजारांपेक्षा जास्त सदस्यांचा झालाय आणि हा आकडा इथेच थांबणार नाही तर आणखी वाढणार आहे. अर्थात या मोठ्या कुटुंबाच्या आवडी जपणं हे आमचं कर्तव्य आहे. आमचीही जबाबदारी वाढलीये, आम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणखी उत्तम काम करू, चुकांमधून शिकून काहीतरी चांगलेच देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरचStory Junction - MARATHI PODCASTवर तुमच्यासाठी भरपूर नव्या गोष्टी घेऊन येऊ... तोवर तुम्हीही ऐका, तुमच्या कुटुंबियांना, परिजनांना व मित्र मैत्रिणींनाही आपले हे पॉडकास्ट ऐकावा, आणि हो तुमचे चांगले वाईट जसे असतील तसे अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हालाही योग्य ते बदल करता येतील.
For feedback or any queries please mail us atpodcast@d4mad.in
Fri, 20 Nov 2020 - 08min - 12 - Ep. 07. Haunted Guest House (Lockdown chya Goshti) | हॉंटेड गेस्ट हाऊस (लॉकडाऊनच्या गोष्टी)
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बाहेगावांवरून येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन सेंटर्सला थांबवलं जात होतं. त्या काळात अनेकांनी काही नवनवीन अनुभव घेतले. हा एपिसोड म्हणजे आपल्या एका मित्राला क्वारंटाईनमध्ये आलेला असाच एक आगळावेगळा अनुभव!
आपला हा मित्र त्याच्या गावाबाहेरच्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईनसाठी थांबलाय. पण हे गेस्ट हाऊस हॉंटेड असून इथे एक भूत राहत असल्याचं त्याने लहानपणापासून ऐकलंय. त्याचा काही त्या गोष्टीवर विश्वास नसल्याने जाण्याआधी तो निर्धास्त असतो. पण तिथे गेल्यावर आणि प्रत्यक्ष राहिल्यावर त्याला काही भयानक अनुभव यायला लागतात. या गेस्ट हाऊसमध्ये त्याला एक चांगला मित्रही भेटतो. हे दोघे मिळून त्या भूताच्या गोष्टीचा माग घेतात आणि त्यांना शेवटी जे सापडतं ते अगदीच धक्कादायक असतं. पण ते नेमकं काय असतं? जाणून घेण्यासाठी ऐका लॉकडाऊनच्या गोष्टींचा हा सातवा एपिसोड, 'हॉंटेड गेस्ट हाऊस!'
ही स्टोरी लिहिलीये शारदा भवर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख, आरजे प्रथम व शरद खोबरे यांनी आणि प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
Tue, 27 Oct 2020 - 29min - 11 - Ep. 06. Perfect Murder (Lockdown chya Goshti) | परफेक्ट मर्डर (लॉकडाऊनच्या गोष्टी)
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. काही कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले तर काही आणखीनच दुरावले. मात्र या सर्वांपलीकडे काही कुटुंब अगदी उध्वस्तही झाले. अशाच एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. सुखी, आनंदी असणाऱ्या या कुटुंबाच्या सुखाला नकळत गालबोट लागलं आणि घटनांच्या ग्रहणाने या कुटुंबाला कायमचं अंधारात ढकलून दिलं. या कुटुंबाचा कर्ता पुरुष हा एक मुलगा, पती आणि बाप तर आहेच, सोबतच तो एक साधाभोळा, सर्वसामान्य माणूस आहे जो आपल्या कुटुंबावर निस्वार्थ प्रेम करतो. या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात एकामागे एक संकटं येऊन धडकतात. ही व्यक्ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतच असते आणि अशातच त्या घटनांचं सत्य त्याच्यासमोर येतं. काय होतंय नक्की जाणून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका "परफेक्ट मर्डर!"
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख व आर जे हर्षदा माळी यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in - www.RJPrasad.in
Wed, 24 Jun 2020 - 26min - 10 - Ep. 05. Karjachi Fule (Lockdown chya Goshti) | कर्जाची फुलं (लॉकडाऊनच्या गोष्टी)
शेतकऱ्याचं नशीब निसर्गावर अवलंबून असतं. जगाला अन्न पुरवणारा हा शेतकरी निसर्गाने साथ दिली नाही तर स्वतःच उपाशी राहतो. आजच्या गोष्टीतील शेतकऱ्याला सद्यस्थितीत निसर्गाने तर साथ दिली पण वेळेने नाही. रात्रंदिवस कुटुंबासोबत शेतात राबलेला हा शेतकरी सुगीच्या आशेने एक स्वप्न उराशी बाळगून बसलाय. पण वेळ अशी आली की त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं हे स्वप्न स्वप्नच राहून गेलं.
ही स्टोरी लिहिलीये शारदा भवर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
Sat, 13 Jun 2020 - 11min - 9 - Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी)
रोजच्या कमाईवर स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यक्ती लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावून बसतो आणि नाईलाजाने कुटुंबाला सोबत घेऊन गावचा रस्ता धरतो. जगण्याची नवी आशा मनात घेऊन गावची वाट पायी तुडवत हे कुटुंब निघालंय. पण ही वाट त्यांना एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाते. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षातही अनेक मजूर, कामगार काम नसल्याने अशाच रीतीने आपापल्या गावी निघाले. दुर्दैवाने कित्येक लोक पोहचू देखील शकले नाहीत. आजची गोष्ट ही या सगळ्यांच्या आयुष्याचं एक कल्पनाचित्र आहे.
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in - www.RJPrasad.in
Wed, 10 Jun 2020 - 08min - 8 - Ep. 03. Love ki Arrange? (Lockdown chya Goshti) | 'लव्ह की अरेंज?' (लॉकडाऊनच्या गोष्टी)
'लॉकडाऊनच्या गोष्टी' सिरीजमधील ही तिसरी गोष्ट! टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाजा आलाच असेल की ही एका लग्नाची गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न व्हायचंय ते कपल आहे आजच्या पिढीतलं, ज्यांना पारंपरिक विवाह सोहळ्यात होणारा अनेक गोष्टींचा अपव्यय टाळावा असं वाटतं. पण त्यांचे आईवडील मात्र सगळ्याच ९० च्या दशकातील आईवडिलांसारखे आहेत. त्यातल्या त्यात यांना लव्ह मॅरेज करायचंय. इथेही घरचे नकार देतील अशीच शंका जास्त आहे. अशा सर्व छोट्या-मोठ्या अडचणींमधून शेवटी या कपलला मार्ग सापडतो की नाही आणि लॉकडाउनच्या काळात हे सगळं घडत असल्याने त्याचा यांच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ऐका आजचा एपिसोड, 'लव्ह की अरेंज?'
ही स्टोरी लिहिलीये शारदा भवर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
Fri, 05 Jun 2020 - 08min - 7 - Ep. 02. Pravas (Lockdown chya Goshti) | प्रवास (लॉकडाऊनच्या गोष्टी)
दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आजची स्टोरी अशाच एक कंडक्टरच्या आयुष्याची आहे ज्याने दंगली पाहिल्या, जाळपोळ पाहिली, आयुष्याच्या चढ-उताराने त्याला नोकरी नकोशी वाटू लागली. पण लॉकडाऊन मुळे असं काही घडलं की त्याच्या जीवनाचा अर्थच बदलला. तर मग ऐका आजची स्टोरी 'प्रवास'!
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय आर जे प्रसाद अर्थात प्रसाद देशमुख यांनी आणि प्रोड्युस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मेसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
Wed, 03 Jun 2020 - 06min - 6 - Ep - 01. Baayko ! (lockdown chya goshti) | Ep - ०१. - बायको ! (लॉकडाउनच्या गोष्टी )
लॉकडाऊनच्या गोष्टींमधील ही पहिली स्टोरी आहे एका कपलची, ज्यांचं अरेंज मॅरेज झालंय. हे दोघे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे आहेत. पण त्यांच्या याच स्वभावांमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नात्यात एक आश्चर्यकारक बदल घडतो, पण तो चांगला की वाईट हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड आवर्जून शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टींची आपल्याला अपेक्षा असते, पण जे हवं ते सगळं मिळेलच असं नाही आणि बऱ्याचदा आपल्याला जे मिळतं ते आपल्याला हवं त्यापेक्षा कदाचित बेटरही असू शकतं! हेच सांगणारी आमची आजची स्टोरी ऐका आणि कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
- www.RJPrasad.in
Mon, 01 Jun 2020 - 07min - 5 - मरण्याच्या क्षणभर आधी कळलं | Marnyachya Kshanbhar Aadhi Kalal - Audio Blog
एक व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन सैरभैर धावतोय, त्याला माहितीये थांबला तर संपला! पण असं काय लागलंय त्याच्यामागे आणि का तो त्याच्यापासून पळतोय? हे जाणून घेण्यासाठी ऐका आमचा आजचा पॉडकास्ट मरण्याच्या क्षणभर आधी कळलं… काही चुका माणसाला आयुष्यभर कळत नाहीत आणि जेव्हा कळतात तेव्हा फार उशीर झालेला असतो, मात्र तेव्हा गेलेली वेळ परत येत नाही. स्टोरीतून मी तुम्हाला संधी देतोय गेलेल्या वेळात परत जाण्याची, सगळं ठीक करण्याची...
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जेप्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
Fri, 29 May 2020 - 06min - 4 - पण तुम्ही माणूस नाही! | Pan Tumhi Manus Nahi - Audio Blog
गप्प बसून अन्याय सोसणाऱ्याला आपण कोण आहोत हे आठवण करून देणारी आमची तिसरी स्टोरी…पण तुम्ही माणूस नाही!!"
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.inTue, 26 May 2020 - 03min - 3 - आणि गंमत म्हणजे तुला ठाऊकही नाही | Aani Gammat Mhanje Tula Thaukahi Nahi - Audio Blog
आपलं मन हे फारच चंचल असतं, त्याला स्थैर्य म्हणून कधी नसतंच. असंच एका तरुणाचं मन एका सुंदर तरुणीवर येऊन ठेपलंय आणि त्याचं महत्वाचं कारण आहे पाऊस! पावसात चिंब भिजलेली ती अनोळखी सुंदर मुलगी पाहून हा तरुण तिला दूर घेऊन गेला, तिच्या सोबत चहा प्यायला, तिच्या नाजूक बटांशी खेळला पण तिला याची खबरही नाही! आता तुम्ही म्हणाल "हे कसं शक्य आहे?" अहो शक्य आहे. ऐकून तर पहा आमची दुसरी स्टोरी "आणि गंमत म्हणजे तुला ठाऊकही नाही!"
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
Tue, 26 May 2020 - 04min - 2 - दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog
आम्ही सादर करतोय आमची पहिली स्टोरी, "दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!"
एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा...
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.inTue, 26 May 2020 - 04min - 1 - Dangalit Haravleli Shudhhlekhanachi Vahi - Trailer
आम्ही सादर करतोय आमच्या पहिल्या वहिल्या गोष्टीचा ट्रेलर जीचं नाव आहे दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!
एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा... लवकरच....
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
- www.RJPrasad.in
Sat, 23 May 2020 - 00min
Podcasts similaires à Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट
- الحل إيه؟ مع رباب المهدي - Elhal Eh? with Rabab El-Mahdi Alternative Policy Solutions - حلول للسياسات البديلة
- بعد أمس Atheer ~ أثير
- El Partidazo de COPE COPE
- Herrera en COPE COPE
- The Dan Bongino Show Cumulus Podcast Network | Dan Bongino
- Es la Mañana de Federico esRadio
- La Noche de Dieter esRadio
- Hondelatte Raconte - Christophe Hondelatte Europe 1
- La Grande interview Europe 1 - CNews Europe 1
- franceinfo: Les informés France Info
- C dans l'air France Télévisions
- ملفات بولـيسية Medi1 Podcast
- Más de uno OndaCero
- Archives d'Afrique RFI
- Les histoires incroyables de Pierre Bellemare RTL
- El Larguero SER Podcast
- Nadie Sabe Nada SER Podcast
- SER Historia SER Podcast
- Listening Time: English Practice Sonoro | Conner Pe
- كتب صوتية أبو راشد
- فنجان مع عبدالرحمن أبومالح ثمانية/ thmanyah
- العلم والإيمان - د. مصطفى محمود علم ينتفع به
- نقاش مونت كارلو الدولية مونت كارلو الدولية / MCD
- 辛坊治郎 ズーム そこまで言うか! ニッポン放送
Autres podcasts de Société et Culture
- Free DJ Beats by SK Infinity Music Sandeep Khurana
- Bhagavad Gita Hindi Yatharth Geeta
- Bhagavad Gita Spydor Studios
- Kahani Suno Sameer Goswami
- TED Talks Daily TED
- Global News Podcast BBC World Service
- The History of India Podcast Kit Patrick
- 1001 Classic Short Stories & Tales Jon Hagadorn
- Khatu Naresh Bhajan Hubhopper
- The Musafir Stories - India Travel Podcast Saif & Faiza
- Swami Vivekanand Life Stories. Target state psc
- Mp3 Quran In Urdu Language TrueMuslims.Net
- Stuff You Should Know iHeartPodcasts
- Telugu Stories Kadachepta Team
- Bhojpuri Murder Mystery Red FM
- Munshi Premchand ki Kahaniyan wa Upanyas मुंशी प्रेमचंद की कहानियाँ व उप Sameer Goswami
- Cinema-e-Bhojpuri Red FM
- Kuku FM - Bharat ki kahaniyan KUKU FM
- LANZ & PRECHT ZDF, Markus Lanz & Richard David Precht
- Telugu Talkies Telugu Talkies