Filtrar por gênero

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

Rajhans Prakashan

Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades.  विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan  Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.

31 - 30. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनप्रवास | Abhisheki | Rajhans Prakashan
0:00 / 0:00
1x
  • 31 - 30. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनप्रवास | Abhisheki | Rajhans Prakashan

    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/abhishekee-pandit-jitendra-abhisheki-abhashhaka-padata-jatathara-abhashhaka पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ. Book: Abhisheki Author: Shaila Mukund Podcast Host: Dr Sadanand Borse Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #rajhansprakashan #jitendraabhisheki #shaunakabhisheki #bookreview Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 20 Nov 2024
  • 30 - 29. पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा! | Vasundhareche Shodhyatri | Marathi Podcast

    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vasundhareche-shodhayatri-vasathharaca-shathhayatara प्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या दोन हजार वर्षांतील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Book: Vasundhareche Shodhyatri Author: Dr. Anurag Lavhekar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #rajhansprakashan #newbook #marathi #dranuraglavhekar #bookreview Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 13 Nov 2024
  • 29 - 28. आपण एका टकमक टोकाकडे चाललोय? | Atul Deulgaonkar | Nisargakallol

    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nisargakallol-nasaragakallli कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच: हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्कीच नाही. माणसानं निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगणारं निसर्गकल्लोळ हे पुस्तक घेऊन लेखक, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आले आहेत. Book: Nisargakallol Author: Atul Deulgaonkar Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #atuldeulgaonkar #marathiliterature #rajhansprakashan #nisargakallol Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 06 Nov 2024
  • 28 - 27. वस्त्र परंपरेचा अनमोल ठेवा | Vastragatha | Vinay Narkar

    Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vastragatha-vasataragatha अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध. Book: Vastragatha Author: Vinay Narkar Podcast Host: Dr Sadanand Borse Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #vinaynarkar #drsadanandborse #newbook #rajhansprakashan Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 23 Oct 2024
  • 27 - 26. दंव भिजली वही | Himanshu Kulkarni | Marathi Poetry

    कवितासंग्रहाची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/davbhijaleee-vahee-thava-bhajal-vaha "फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे." - मंगेश पाडगावकर Book: Davbhijalee Vahee Poet: Himanshu Kulkarni Podcast Host: Vandana Bokil-Kulkarni Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #davbhijaleevahee #marathipodcasts #poetry Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 16 Oct 2024
Mostrar mais episódios