Podcasts by Category

Sex Aani Barach Kahi

Sex Aani Barach Kahi

Lets Talk Sexuality

लैंगिकता शिक्षण आणि माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने http://letstalksexuality.com ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. याच वेबसाईटचा भाग म्हणून सेक्स अणि बरंच काही हे पॉडकास्ट निर्माण झालेले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातुन लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा, लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं तरुणांना समजावीत हे महत्वाचे उद्देश आहे. पॉडकास्टच्या माध्यमातुन होणा-या चर्चा व संवादामुळे लैंगिकता या विषयाबद्दल युवकांमध्ये निरोगी दृष्टीकोन निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे. ही वेबसाइट व पॉडकास्ट ‘तथापि ट्रस्ट – स्त्रिया आणि आरोग्य संसाधन केंद्राने’ तयार केली आहे. ना नफा या तत्वावर आम्ही हे काम करत आहोत. अधिक माहितीसाठी letstalksexuality.com@gmail.com किंवा tathapi@gmail.com या मेलवर विचारणा करु शकता. लैंगिकता विषयाची मराठीत माहिती घेण्यासाठी http://letstalksexuality.com या वेबसाईटला नक्की भेट द्या. तथापि ट्रस्ट च्या कामाबाबत अधिक माहितीसाठी www.tathapi.org इथे जरुर भेट द्या.

18 - मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४
0:00 / 0:00
1x
  • 18 - मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४

    मागील भागात आपण आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं, तेव्हा पडलेले प्रश्न अन त्यानंतर आयुष्यात काय काय घडलं हे पाहिलं.  याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठपर्यंत आला, या शोधात लैंगिकतेचे काय काय पैलू आमच्यासमोर आले, तसेच मुलाला या लैंगिकतेसोबत आम्ही स्विकारलं का? याबद्द्लची माहिती कुठे कुठे मिळाली असेल? अन महत्वाचं म्हणजे आमच्या मनातली कोडी सुटली असतील का? हेच आपण या भागात आपण पाहणार आहोत. . पुढे काय होतंय याबद्दल तुम्हालाही उत्सुकता असेल ना? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आगळ्या वेगळ्या ग़ोष्टी. गोष्ट आवडल्यास इतरांना ऐकवा, शेअर करा, अन हो खाली कमेंट ही करा. आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

    Tue, 04 Feb 2020 - 19min
  • 17 - मी ‘गे’ मुलाचा बाप…(पूर्वार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३

    मुद्दा समजुन घेण्याचा आहे, मुद्दा स्वीकारण्याचा आहे. जेव्हा आमच्या मुलाने, “मी गे आहे” असं सांगितलं तेव्हा खरं तर आधी काही समजलंच नाही, आम्हाला खूपच मोठा धक्का होता. डोक्यात वादळ होतं, याचा अर्थ काय? - अज्ञान असं असूच कसं शकतं? - नकार आमच्याच बाबतीत असं का घडावं? - असहाय्यता यातून काही मार्गच नाही का? - निराशा होस्टेल वर काही अत्याचार तर झाले नसतील त्याच्यावर? - कुशंका बहूतेक आम्ही आईबाप म्हणून कमी पडलो की काय? - आत्मश्लाघा येईल आपोआप मार्गावर - आशा लग्न करुन दिलं ना की होईल सगळं ठिक - भाबडेपणा. कशी शोधणार या प्रश्नांची उत्तरं? कुणाकडं जाणार? आजवर प्रश्न पडले नव्हते असं नाही पण या प्रश्नाची जातकुळीच वेगळी... खूप दमवलं आम्हाला या प्रश्नांनी .... या असंख्य प्रश्नांमधून त्यांना मिळालं का उत्तर? पुढे काय झालं असेल जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आगळ्या वेगळ्या ग़ोष्टी.

    Tue, 21 Jan 2020 - 15min
  • 16 - सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - उत्तरार्ध

    मागील भागात आपण ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ या विषयाला घेऊन तथापि ट्रस्ट सोबत मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे यांच्यासोबत गप्पा मारल्या. याच विषयाचा हा दुसरा भाग आज घेऊन आलेलो आहोत. आजच्या भागात आपण बौद्धिक अपंगत्व असणा-या मुलांच्या पालकांना काय काय चिंता सतावत असतात, त्यासाठी काय काय प्रयोग केले गेले आहेत हे ऐकणार आहोत. आपल्या या मित्र मैत्रीणींने लग्न करावं की नाही? त्यामध्ये काय जबाबदा-या असू शकतात? तसेच मुलींच्या बाबतीत विचार करताना पाळी, स्वच्छता, लैंगिक शोषण व त्यासोबत येणारी पालकांची काळजी अन त्यातुन मुलींच्या गर्भाशय काढण्याबाबत काय भूमिका असावी अशा निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे. आपल्या बेवसाईटच्या तरुण वाचकांना जर या कामात जोडून घ्यायचं असेल तर आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत. तो काय आहे याची देखील चर्चा या पॉडकास्ट मध्ये केलेली आहे. चला तर ऐकूया निहार अन गौरी सोबत ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावरील हा दुसरा भाग. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा… तेव्हा भेटू या पुढच्या भागात नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

    Mon, 30 Dec 2019 - 18min
  • 15 - सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता - पूर्वार्ध

    लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक गरजा नसतातच किंवा त्या नसाव्यात असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं नाही. शरीराची एखादी क्षमता कमी आहे याचा अर्थ या भावना किंवा लैंगिक नाती ठेवण्याची इच्छा निर्माण होणार नाही असं थोडंच आहे? त्यातही मानसिकदृष्ट्या अपंगत्व असेल, मतिमंदत्व, गतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, अशा मानसिक स्वरुपाच्या अपंगत्वामध्ये भावना, त्यांची अभिव्यक्ती या गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होतात. म्हणुनच याच विषयावर माहिती देण्यासाठी तथापि ट्रस्ट सोबत  ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ याविषयी मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. या कामामध्ये त्यांना आलेले अनुभव, पालकांना येणा-या अडचणी, पालकांसाठी तयार केलेले स्वीकार आधार गट कसे काम करतात, अपंगत्व आणि लैंगिकतेबाबत पालक-शिक्षक-नातेवाईक म्हणुन सकारात्मक मार्ग काय असू शकतात किंवा काय मार्ग इतरांनी शोधले आहेत, अशा अनेक बाबींवर आज चर्चा झालेली आहे. चला तर ऐकूया निहार अन गौरी सोबत ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावरील हा पहिला भाग. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा… तेव्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.

    Fri, 15 Nov 2019 - 19min
  • 14 - आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग २: ना मी बाई ना मी पुरुष – उत्तरार्ध

    नमस्कार मंडळी, तुमच्या प्रेमापायी खास तुमच्यासाठी आम्ही आणलेल्या या आगळ्या वेगळ्या लोकांच्या  गोष्टी आवडल्या असतील अशी आशा बाळगतो.  मागील भागात तुम्ही दिशाने सांगितलेली गोष्ट ऐकली आहे,  उरलेली गोष्ट ऐकायची तुमची इच्छा आता या भागात पूर्ण होणार आहे. दिशाची गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं? आपल्या समाजाचा भाग असूनही तुम्हाला अशा किती दिशांबद्दल माहिती आहे? तुमचे आजपर्यंतचे विचार काय होते अन या गोष्टीनंंतर काय आहेत? आम्हाला नक्की कळवा.  दिशा एक उत्तम कवियत्री आहे हे आपल्याला आता कळलेलेच आहे. तिच्याबाबत व तिच्या कामाबाबत अधिक जाणुन घ्यायचे असल्यास तिला तुम्ही फेसबुक वर शोधु शकता.   तेव्हा ऐकत राहा आगळ्या वेगळ्या लोकांच्या आगळ्या वेगळ्या गोष्टी. गोष्ट आवडल्यास इतरांना ऐकवा, शेअर करा, अन हो खाली कमेंट ही करा. आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

    Fri, 25 Oct 2019 - 19min
Show More Episodes